नव्या वर्षात टीव्ही, स्मार्टफोन महागणार

सप्टेंबर 2025 मध्ये GST कमी झाल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या होत्या. यामध्ये स्मार्ट टीव्हीचाही समावेश होता. स्मार्ट टीव्हीवर पूर्वी 28 टक्के GST लागायचा, जो आता 18 टक्के झाला आहे. मात्र टीव्हीच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे घसरत जाणारा रुपया आणि स्मार्ट टीव्हीमध्ये वापरली जाणारी AI चिप. रुपयाचे अवमूल्यन होत असून रुपया डॉलरच्या तुलनेत 90 पार पोहोचला आहे. त्यामुळे आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर परिणाम होणार आहे.

मेमरी चिप्सच्या किंमती वाढल्याने आणि रुपया घसरल्यामुळे GSTचा जो फायदा मिळत होता, तो आता संपुष्टात येणार आहे. मागील चार महिन्यांत मेमरी चिप्सची किंमत सहापटीने वाढली आहे. त्यामुळे टीव्हीच्या किमती वाढतील आणि परिणामी मागणीही कमी होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते DDR3 आणि DDR4 मेमरी चिप्सचा पुरवठा कमी झाला आहे आणि यामागे AI डेटा सेंटरची वाढती मागणी हे कारण आहे.