
पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅकर्सने हॅक केले आहे. हे अकाऊंट त्यांचे खासगी अकाऊंट नसून त्यांच्या वेबसाईटशी जोडलेले आहे. या अकाऊंटला तब्बल 2.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या अकाऊंटवरून पीएम फंडाला मदत करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी देखील स्वीकारली जात असून बिटकॉईन दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॅक झालेले अकाऊंट पूर्ववत करण्यात आले असून फेक ट्विट डिलीट केले आहेत.




























































