ट्विटर ‘फ्लिट्स’ फीचर करणार बंद! आठ महिन्यांपूर्वीच केले होते लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लाँच केलेले ‘फ्लिट्स’ हे फीचर बंद करणार असल्याची घोषणा ट्विटरने केली आहे. हे फीचर इन्स्टाग्राम स्टोरीपासून प्रभावित होते. फ्लिट्स 3 ऑगस्टपासून बंद केले जाईल. त्याऐवजी कंपनी दुसरे फीचर आणणार आहे. फ्लिट्सकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र आता निरोप घेण्याचा वेळ आल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

फ्लिट्सवरून लोक अगदी सहजपणे चर्चा करतील असे वाटले होते. मात्र जे युजर्स जास्त ट्विट्स करत होते तेच याचा वापर करत आहेत. अनेक युजर्सला फ्लिट्समध्ये रस नव्हता. युजर्सची अपेक्षेप्रमाणे संख्यादेखील वाढत नव्हती, असे स्पष्टीकरण ट्विटरने दिले आहे.
फ्लिट्समध्ये युजर्स जास्त करून फोटो, व्हिडिओ शेअर करायचे जे 24 तासांनंतर आपोआप रिमूव्ह केले जायचे. सध्या नव्या फीचरवर काम सुरू आहे. त्यात फूल स्क्रीन पॅमेरा, टेक्स्ट फॉर्मेटिंग ऑप्शन आणि जीआयएफ स्टिकर्स असतील. तसेच टाइमलाईन स्क्रीनचा महत्त्वाचा भाग असल्याने त्यावर काही नवीन फीचर्सदेखील मिळतील, अशी माहितीही ट्विटरने दिली आहे.