
मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या दोघांना युनीट सहाने चतुःशृंगी परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 11 हजारांचा अमली पदार्थ जप्त केला. विराज इंद्रकांत छाडवा (वय 32, रा. पांडवनगर) , जयेश भारत कोटियाना (वय 20, रा. टिंगरेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पांडवनगर परिसरात दोघेजण मेफेड्रॉन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने विराज आणि जयेशला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7ग्रॅम मेफेड्रॉन, दोन मोबाइल, स्वयंचलित वजनी काटा असा ऐवज जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.































































