दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी तरुणाला लुटले

thief-ran-jail

रस्त्याने पायी जाणाऱ्या एका तरुणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी अडवून अडीच हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्रे हिसकावून नेली. ही घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरात घडली. याप्रकरणी खराडी येथील 32 वर्षांच्या तरुणाने चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार तरुण 22 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास ग्रॅन्ट रोड म्हसोबा मंदिराच्या समोरील रस्त्यावरून पायी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी जबरदस्तीने तरुणाच्या पाठीमागील खिशातील अडीच हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्रे हिसकावली. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या