दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

457

न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुंडे हायस्कूल जवळ गुरूवारी रात्री साडे बारा वाजता दोन दुचाकींची धडक झाली. या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मयताचे नाव सुनिल वाघमारे (26 रा. कामठा, उरण) असे आहे.

सुनिल वाघमारे आणि आकाश डोंगरे (19) हे दोघेजण वेगाने एका दुचाकीवर उरणकडे निघाले होते. त्याच वेळेला अन्वर जागिरदार (43) रा. बालई रोड, उरण हे विरूद्ध दिशेने येत असताना चुकीच्या मार्गाने येवून सुनिल वाघमारे यांच्या दुचाकीने अन्वर जागीरदार यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तीघेजण गंभीर जखमी झाले. यापैकी गंभीर जखमी झालेल्या सुनिल वाघमारे यांना वाशी येथिल फोर्टीज येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अन्वर जागीरदार हे पनवेल येथे पुरोहीत क्लिनिक मध्ये उपचार घेत आहे. त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली असून ते कायमस्वरूपी जायबंदी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आकाश डोंगरे हा नेरूळ येथे डि.वाय. पाटील रूग्णालयात उपचार घेत आहे. या बाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात सुनिल वाघमारे याच्यावर अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या