
आसाममधील ब्रह्मपुत्र नदीतील निमती घाटाजवळ दोन बोटींमध्ये टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या दोन्ही बोटींत मिळून तब्बल 120 प्रवासी होती. त्यातील अनेक जण बेपत्ता आहेत. सध्य़ा एऩडीआरएफ व एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे.
Assam | Two boats carrying approximately 120 passengers collided in the Brahmaputra river in Jorhat today, many passengers missing; rescue operation underway: DG NDRF Satya N. Pradhan pic.twitter.com/TQmQSm1NAK
— ANI (@ANI) September 8, 2021
एक बोट ही माजुली गावावरून निमती घाटाच्या दिशेने जात होती. तर दुसरी बोट ही सिरोड गावावरून येत होती. दोन्ही बोटी अचानक एकमेकींच्या समोरा समोर आल्याने त्यांच्यात टक्कर झाली व दोन्ही बोटी उलटल्या. त्यामुळे बोटीतीलसर्व प्रवासी पाण्यात पडले.
Saddened by the boat accident in Assam. All possible efforts are being made to rescue the passengers. I pray for everyone’s safety and well-being.
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2021
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुख: व्यक्त केलं आहे. ‘आसाम बोट दुर्घटनेमुळे मी दुखी झालो आहे. प्रवाशांना वाचवायचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतोय’, असे ट्विट मोदींनी केले आहे.
Assam CM Himanta Biswa Sarma confirms boat accident near Nimati Ghat, Jorhat
“Advising state minister Bimal Borah to immediately rush to the accident site. I’ll also visit Nimati Ghat tomorrow” he says. pic.twitter.com/yYcG0jb84b
— ANI (@ANI) September 8, 2021



























































