मुळा नदीपात्रात आढळले दोन मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

एकाचा विहीरीत तर दुस-याचा मुळा नदीपात्रात मृतदेह आढळल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली असुन या घटना घातपाताच्या की आत्महत्या या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे .

पहिली घटना तालुक्यातील वांबोरी येथील राजवाडा वेशीजवळ विहीरीत घडली. राजमहंमद शेख यांचा मृतदेह विहीरीतील पाण्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्सटेबल शैलेश सरोदे यांनी घटनास्थळी जावुन परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीतील मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनानंतर राजमहंमद यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.

दुसरी घटना बारागाव नांदुर येथील मुळा धरणाच्या लगत नदीपात्रात उघड झाली. तबाजी बाबुराव पवार वय ६० राहणार बारागाव नांदुर यांचा नग्न अवस्थेतील मृतदेह मुळा नदीपात्रातील पाण्यात तरंगताना आढळून आला.घटनास्थळी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने ही घटना घातपाताची की आत्महत्या या बाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

तबाजी पवार हे काल सायंकाळ पासुन घरातुन बाहेर पडले होते. आज सकाळी ७ वाजता बारागाव नांदुर परिसरातील मुळा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.

स्थानिक ग्रामस्थांनी आज सकाळी दिलेल्या माहिती वरून नातेवाईकांनी मुळा नदीपात्रात जावुन मृतदेह बाहेर काढला.आज दुपारी राहुरी येथे शव विच्छेदना नंतर तबाजी यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.