बेस्ट! दोन कंडक्टरची कोरोनावर यशस्वीपणे मात

प्रातिनिधीक फोटो

बेस्टमधील गोरेगाव डेपोचे दोन कंडक्टर कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर दोन विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दोन्ही कंडक्टरनी कोरोनावर आता यशस्वीपणे मात केली आहे. पहिला कंडक्टर मीरा रोड येथे वास्तव्यास असून त्याला 13 एप्रिलपासून ‘तांबे’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्याला मंगळवारी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. तर गोरेगाव आगारातील दुसरा कंडक्टर ही बरा होऊन स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मधून त्याला डिस्चार्ज मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या