पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील मंगुजळगाव येथे पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवाळीतील पाडव्यालाच घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मंगुजळगाव येथील संदीप रघुनाथ खरात व राम बापुराव कांबळे हे दोन मित्र मंगळवारी राणी उंचेगाव शिवारातील छोट्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना दुपारी बारा वाजेदरम्यान घडल्याचे सांगण्यात आले. घटनेबाबत समजल्यावर ग्रामस्थांनी दोघांचेही मृतदेह तलावाबाहेर काढले. अंबड पोलीसांना घटनेबाबत कळवण्यात आले आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन राणी उंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत करण्यात येणार आहे.