अमृतसरमध्ये गुरुद्वारात जप करणाऱ्या भाविकांवर लोखंडी प्लेट कोसळली; दोघींचा मृत्यू, आठ जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमृतसरमधील गुरुद्वारा शहीदान साहिब येथे कार सेवेदरम्यान भीषण अपघात घडला. जप करणाऱ्या महिला भाविकांवर लोखंडी शटरिंग प्लेट कोसळली. यात दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर आठ जणी जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे गुरुद्वाराच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर पोलीस आणि प्रशासकीय पथकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुद्वारा साहिब येथे चौपाहिरा दरम्यान ही दुर्घटना घडली. सर्व महिला धार्मिक विधी आणि मंत्रोच्चार करत होत्या. सर्व जखमी महिलांना प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि नंतर इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोन ते तीन जणींची प्रकृती गंभीर आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या संगत आणि प्रशासकीय पथकांच्या मदतीने जखमींना ढिगाऱ्याखालून आणि गर्दीतून बाहेर काढण्यात आले. अपघाताबाबत सखोल चौकशी केली जाईल. चौकशीअंतीच अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे एडीसीपी विशालजीत सिंग यांनी सांगितले.