कोल्हार-लोणी रोडवर कंटेनरच्या धडकेत दोन चालकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हार-लोणी रोडवर दोन कंटेनरची समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन व्यक्तिंचा जागीच मृत्यू झाला. अपघातात धडक बसलेल्या दोन्ही कंटेनरचा चक्काचूर झाला आहे. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

संतोष बाळू राख (रा. हतोला ता. आष्टी) आणि सुनील हरिदास जयभाये ( 24 रा. जयभाये वाडी ता. जामखेड), अशी या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, काल पहाटे ट्रक क्रमांक MH 23 AU 2349 हे वाहन कोल्हारच्या दिशेने जात होते. तर ट्रक क्रमांक MH 46 AR 2882 हे वाहन लोणीच्या दिशेने येत होते. लोणी-कोल्हार रोडवरील साई वीरा पेट्रोलपंपाजवळ दोन्ही कंटेनरची समोरासमोर धडक बसून हा भीषण अपघात झाला. दोन्ही कंटेनरमध्ये केवळ चालकच होते. त्यामुळे दोन्ही वाहनांच्या चालकांचे या अपघातात निधन झाले.

या अपघातात दोन व्यक्तिंचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळतात लोणीचे सपोनि समाधान पाटील आणि पीएसआय योगेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शिवविच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.