प्रवरा नदीत पोहायला गेलेल्या दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

नेवासा तालुक्यातील खुपटी येथील प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल पावलस ठुबे यांच्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

महादेव मंदिर परिसरात प्रवरा नदी पात्रात दोन पुरुषांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहचलो असता तेथे दोघांचे मृतदेह तरंगत होते. स्थानिकांच्या मदतीने ते मृतदेह वाहेर काढले. मृतांमध्ये माझा भाऊ प्रवीण पावलस ठुबे (वय 30) याचा समावेश होता. तर दुसरा मृतदेह दिपक प्रकाश घोरपडे (वय 30) यांचा होता, अशी माहिती अमोल यांनी दिली आहे.

माझ्या भावजईकडून समजले की, दोन दिवसांपूर्वी दोघेही नदी पात्रात पोहण्यासाठी जातो, असे सांगून गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस रेवणनाथ मरकड करीत आहेत. मृतांचे मतदेह नेवासा फाटा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.