डिजिटल पेमेंटसाठी येणार टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 एप्रिल 2026 पासून डिजिटल पेमेंट करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी पावले उचलली असून यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता यूपीआय, नेट बँकिंग आणि मोबाईल वॉलेटद्वारे होणाऱया प्रत्येक व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू केले जाईल.

नव्या नियमांतर्गत आरबीआयने डिजिटल पेमेंटसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2एफए) बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही ऑनलाईन पेमेंटसाठी यूजर्सला दोन वेगवेगळ्या टप्प्यात आपली ओळख पटवणे आवश्यक असणार आहे. यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शन आधीच्या तुलनेत आणखी सुरक्षित होईल. आतापर्यंत अनेक प्लॅटफॉर्मवर सिंगल क्लिक किंवा एक पिन टाकल्यानंतर पेमेंट होत होते. परंतु, आता सिस्टम बदलणार आहे. नव्या नियमानुसार, प्रत्येक ट्रान्झॅक्शसाठी कमीत कमी दोन ऑथेंटिकेशन फॅक्टर आवश्यक असतील. यात एक फॅक्टर प्रत्येक वेळी बदलणारा हवा.