दोघांच्या अटकेमुळे बॉलीवूड इंडस्ट्रीचे कोट्यवधी वाचले

35

सामना प्रतिनिधी, मुंबई

एकदा गुंतवा आणि भरघोस कमवा असे आमिष दाखवून हजारो नागरिकांना चुना लावणाऱ्या दोघा भामट्यांना साकिनाका पोलिसांनी अटक केल्यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीचे कोट्यवधी रुपये वाचले. इंडस्ट्रीचे अनेकजण आरोपींच्या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत होते. पण वेळीच दोघे पकडले गेले आणि पुढचा अनर्थ टळला.

सुमीत शर्मा आणि सुमेल खान या दोघा भामट्यांनी वॉण्टेड आरोपी राहुल शर्मा याच्या मदतीने क्युरकी टेक्नोलॉजी प्रा. लि. नावाने कंपनी सुरू केली होती. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याची जाहिरातबाजी करून अनेकांना आकर्षित केले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून हजारो लोकांनी त्यांच्या कंपनीत 25 हून अधिक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

अटकेतील आरोपींपैकी एकाचा भाऊ बॉलीवूड इडंस्ट्रीमध्ये काम करतो. त्याने देखील या कंपनीत 16 लाख गुंतवले होते. त्याला सुरुवातीला चांगले व्याज देखील मिळाले. त्यामुळे त्याचे ओळखीचे बॉलीवूडमध्ये काम करणारे 50 ते 60 जण कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार होते. तशी त्यांनी तयारी देखील दाखवली होती. पण पोलिसांनी आम्हाला पकडले आणि सर्व प्रकरण फिसकटले, असे आरोपींच्या चौकशीतून समोर आल्याचे साकिनाका पोलिसांनी सांगितले.

summary- two fraudster got arrested

आपली प्रतिक्रिया द्या