भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडले ; दोन जण जागीच ठार, घटनास्थळावरून ट्रक फरार

47

सामना प्रतिनिधी, मलकापूर (बुलढाणा)

भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. दुचाकीस 200 मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना येथील महामार्गावर ग्राम वाघुड नजिक बजरंग दालमिल समोर 12 जुलै रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान घडली.

बजाज पल्सर दुचाकीने दोघेजण मलकापूर वरून नांदुराकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वारांना चिरडून ट्रकने दुचाकीस दोनशे मीटर पर्यंत घासत नेले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील देशमुख, पत्रकार गजानन ठोसर, पोहेकाँ मदन पवार, शहर वाहतूक पोलीस मिलिंद टाकतोडे, रामेश्वर वाघमारे अनिस पठाण, सिद्धार्थ सुरडकर, हायवे वाहतूक पोलीस सुरेश गवई, नंदकिशोर पवार, कुणाल चव्हाण, संजय पठार, रवींद्र व्यवहारे, ग्राम वाघुडचे पोलीस पाटील गजानन तायडे हे घटनास्थळी दाखल झाले.

पंचनाम्यादरम्यान मृतकाच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून विरेंद्रसिंग राजपूत, बलरामसिंग राजपूत दोघे राहणार ग्राम पटोली, जि. ताजापुर (इंदौर) मध्य प्रदेश असल्याचे समजले. प्रभाकर तायडे, किशोर राऊत, प्रशांत तायडे, प्रभाकर तायडे आदी गावकर्‍यांच्या मदतीने अ‍ॅम्बुलन्सद्वारे दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या