‘या’ शहरात दोन महिने पसरणार अंधार; 2021 मध्ये होणार सूर्यदर्शन

जगात एका शहरात दोन महिने अंधार पसरणार आहे. या शहरात आता 2021 मध्येच सूर्यदर्शन होणार आहे. या शहरात दोन महिने सूर्य उगवणारच नाही. या शहरात आता 23 जानेवारीला दुपारी 2 वाजता सूर्योदय होणार आहे. या शहरातील प्रशासनाने अधिकृतणे 65 दिवस सूर्योदय होणार नसून अंधार पसरणार असल्याचे जाहीर केले आहे. या घटनेमुळे सध्या अमेरिकेतील अलास्का चर्चेत आले आहे.

अलास्का हे ध्रुवीय प्रदेशात येत असल्याने तेथील उतकियागविक शहरात आता थेट दोन महिन्यांनी म्हणजेच 23 जानेवारीला सूर्योदय होणार आहे. उत्तर धुव्राजवळ असणाऱ्या या भागात थंडीच्या काळात दिवस खूप छोटे असतात. या भागात थंडीच्या काळात दिवसाही सूर्यदर्शन होत नाही. उत्तर धुव्रावरील उंचावरील भागात हे शहर असल्याने थंडीच्या काळात सूर्य क्षितिजावर येत नाही. त्यामुळे थंडीच्या दिवसात या भागामध्ये सूर्यदर्शन होत नाही. या स्थितीला ‘पोलर नाइट्स’ म्हणतात.

‘द वेदर नेटवर्क’ ने दिलेल्या माहितीनुसार अलास्कामध्ये 18 नोव्हेंबरला सूर्यास्त झाला आहे. त्यानंतर सूर्यदर्शन झालेले नाही. या सूर्यास्तानंतर आता थेट 23 जानेवारीलाच सूर्योदय होणार आहे. या शहरातील नागरिकांनी या शहरावर बनवण्यात आलेला चित्रपट पाहून अंधार पसरण्याचा आणि 18 नोव्हेंबरच्या सूर्यास्ताचा आनंदोत्सव साजरा केला. सुमारे 4 हजार लोकसंख्या असलेल्या अलास्कामध्ये सूर्य प्रकाश कमी असल्याने हवामान थंड असते. या भागात उणे 10 अंश ते उणे 20 अंशापर्यंत तापमानात घट होते. तर अंधार असणाऱ्या दोन महिन्यात सरासरी तापमान उणे 5 अंशपर्यंत घसरते.

अशी ‘पोलर नाइट्स’ ची स्थिती अलास्काशिवाय रशिया, स्वीडन, फिनलँड, ग्रीस आणि कॅनडातील काही शहरात असते. कॅनडा आणि ग्रीस फिओर्डमध्ये 100 दिवसांपर्यंत अंधार असतो. अनेकदा 100 दिवसानंतर सूर्योदय होतो. त्यामुळे या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते. उत्तर धुव्राजवळचा भाग असल्याने या शहरांमध्ये ‘पोलर नाइट्स’ची स्थिती निर्माण होते.सूर्यप्रकाश नसल्याने हे भाग अतिशीत प्रदेशात येतात.

आपली प्रतिक्रिया द्या