झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । झारखंड

झारखंडमधील दुमका जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. दुमका जिल्ह्यातील गोपीकंदरच्या जंगलात सशस्त्र सीमा बल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली होती. ठार केलेल्या नक्षलवाद्यांकडून एक रायफल, एक शक्तीशाली ग्रेनेड आणि इतर शत्रसाठा व साहित्य जप्त करण्यात आले आहे.