
सामना ऑनलाईन । श्रीनगर
श्रीनगर शहरातील करफल्ली परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नॅशनल कॉन्फरन्सचे दोन कार्यकर्ते ठार झाले आहेत तर एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे मात्र अजून स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. 8 ऑक्टोबरला कश्मीरमध्ये ग्रामपंचायत आणि काही नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठीच नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते नाझीर अहमद भट आणि मुश्ताक अहमद वाणी प्रचार करत असल्याचे समजते. अचानक येऊन घटनास्थळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि पलायन केले. नाझीर आणि मुश्ताक जागीच ठार झाले.





















































