जिल्हा परिषदेतील ऑनलाईन निवेदेत फेरफार प्रकरणी दोघांचे निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पाणीयोजनेच्या दुरुस्ती कामाची ऑनलाईन निविदा ठेकेदाराने कमी रकमेची भरलेली असतांना प्रत्यक्षात लिपिकाने मात्र जास्त रकमेची निविदा दाखवून आर्थिक फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोघांना दोषी धरुन सेवेमधून निलंबीत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी दिली आहे.  सेवेतुन निलंबीत करण्यात आलेल्यामध्ये आनंद दत्तात्रय दिकोंडा, दत्तात्रय भाऊ साळवे यांचा समावेश आहे.

साळवे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिक पदावर काम करीत होता. पाणी योजनेच्या दुरुस्त कामाची ऑनलाईन निविदा ठेकेदाराने कमी रक्कमेची भरली असताना प्रत्यक्षात लिपिकाने मात्र, जास्त रक्कमेची निवीदा दाखवून अर्थिक फेरफार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे पाईपलाईन टाकणे या कामाच्या निविदा रक्कम व कार्यारंभ आदेशात तफावत आढळून आली आहे. या कामाची निविदा रक्कम 1 कोटी 45 लाख 23 हजार 246 इतकी होती. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या. दोन ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या. त्यात संकेत एंटरप्रायजेस या ठेकेदार संस्थेची निविदा 9.21 टक्के इतक्या कमी दराने भरलेली होती. या ठेकेदाराने 1 कोटी 31 लाख 85 हजार 665 रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दर्शविली. ठेकेदाराने निविदा रकमेपेक्षा तब्बल 13 लाख 37 हजार 581 कमी रकमेमध्ये काम करण्याचे मान्य केले असतांना कागदपत्रांमध्ये संगणकावर फेरफार करण्यात आला.

निविदेची कागदपत्रे तयार करून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची सही घेतांना कागदपत्रातील रकमेत 3.21 हा दर टाकून दरवाढ करण्यात आली. म्हणजे 1 कोटी 40 लाख 57 हजार 50 रुपये दराने कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेला तब्बल 8 लाख 75 हजार 391 रुपयांची अफरातफर केल्याची दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पाचेगावच्या कामाची ऑनलाईन निविदा प्रक्रियेत संकेत एंटरप्रायजेसने -9.21 दराने निविदा स्वीकारल्याचे दिसत आहे. परंतू कार्यारंभ आदेश देतांना मात्र 3.21 हा दर देण्यात आला. एकाच कामाच्या निविदेत हा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे यापूर्वीही असे प्रकार झाले नाहीत ना? याची खातरजमा आता करण्यात येणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या निविदांमध्ये कर्मचार्‍यांनी चलाखी करण्याचा प्रयत्न केल्याने आता बांधकाम व लघु पाटबंधारे विभागाच्या निविदाही संशयाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत.

तर दिकोंडा हे कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती पाथर्डी, तथा तत्कालीन कार्यरत निवदा कक्ष यांना जिल्हा परिषद ई-निवीदा कक्षात पदस्थापना देण्यात आली होती. व जिल्हा परिषद ई-निवीदा कक्षात कार्यरत असताना मौजे पाचेगाव ता.नेवासा येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या निवीदेमध्ये निविदा स्विकृतीच्या दरामध्ये त्यांनी फेरफार केल्याचे निदर्शनात आल्याचे चौकशीत सिध्द झाले या प्रकरणाची जिल्हा परिषदेने गांभीर्याने दखल घेत आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी या दोघांना निलंबीत केले आहे.