रुग्णांना बांधून डॉक्टर नर्स गेले जेवायला, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे दोन रुग्णांचा हकनाक जीव गमवावा लागला आहे. दोन रुग्णांना बांधून डॉक्टर आणि नर्स दुपारच्या जेवायला गेले. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात जीएसवीएम  मेडीकल कॉलेजमध्ये तीन रुग्ण भरती होते. त्यापैकी दोन रुग्णांच्या डोक्यांना जबर मार बसला होता. त्यामुळे ते कोमामध्ये गेले होते.. एक रुग्ण ब्रेन डेड झाला होता. सकाळी 11.30 च्या सुमारास हे रुग्ण भरती झाले होते. जेव्हा या रुग्णांना इस्पितळात आणले गेले तेव्हा दोनच कर्मचारी उपस्थित होते. काहींनी रुग्णांना इंजेक्शन दिले आणि थोड्याचे वेळात डॉक्टर येतील असे सांगितले.  काही वेळानंतर ज्युनियर डॉक्टर आले, त्यांनी सिनिय डॉक्टर आल्यावर ते पाहून घेतील असे उत्तर दिले. त्यानंतर एक नर्स आली. तिने या रुग्णांना बँडेजने बेडला बांधून ठेवले आणि लंच ब्रेकनंतर डॉक्टर येऊन तपासतील असे सांगितले. नंतर एक डॉक्टर आला. त्याने ही केस आपली नसल्याचे सांगितले आणि निघून गेला. दोन रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरांनी नर्स आणि ज्युनियर डॉक्टरांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.