राहत्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहता

राहाता येथील १५ चारी शिवारात घरात एकटी असलेल्या महिलेचा विनभंग केल्या प्रकरणी दोघां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी रविंद्र एकनाथ म्हस्ने  व राऊसाहेब पडवळ  हे दोघे दारू पिऊन आले. यातील रविंद्र म्हस्ने याने सदर महिलेला व तिच्या पतीला शिवीगाळ करून तिचा हात धरून असभ्य वर्तन केले. महिलेला व तिया  नवऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दोन्ही आरोपी हे महिलेचे नातेवाईक असून सदर महिलेच्या तक्रारी वरून राहाता पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.