कार व एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, दहा जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

कोपरगाव तालुक्यातील येसगाव जवळ शुक्रवारी सायंकाळी सहा – साडेसहाच्या सुमारास एसटी बस व डस्टर गाडीला भीषण अपघात होऊन यामध्ये दहा जण  जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती सविस्तर वृत्त असे की,  निफाड येथून डस्टर गाडी यातील युवक लग्नाहुन येत असताना येसगाव जुन्या कॅनल जवळ कोपरगाव हुनहन मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. प्रमोद भामरे व गणेश डांगे असे मृतांचे नाव असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.