गणपती विसर्जनावेळी आचरा समुद्रात दोघे बुडाले

1424

गणपती विसर्जनाच्या वेळी आचरा समुद्रात दोन युवक बुडण्याची दुर्घटना गुरुवारी (12) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.  बुडालेल्या दोघाही युवकांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.

घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी आचरा येथे समुद्रात गेलेले प्रशांत तावडे आणि संजय परब गणपती विसर्जन करून माघारी परतत असताना लाटेच्या तडाख्यात पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले.जिवरक्षक रसिक जोशी यांनी जिवाची बाजी लावून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र बुडालेल्या तावडे, परब यांनी एकमेकांना मिठी मारल्याचे काहींनी पाहिले होते. मात्र त्यांनंतर ते पाण्यात बुडाले.

आपली प्रतिक्रिया द्या