तरूणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या भांडणाच्या रागातून तरूणाला मारहाण करून महिलेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 30 डिसेंबरला ताडीवाला रस्ता परिसरातील लुंबीनानगर येथे घडली. धनेषा उर्फ तुषार अशोक साळवे (वय 20), आणि शुभम महेंद्र भोसले (वय 25, दोघेही रा. ताडीवाला रस्ता ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी 30 डिसेंबरला बाळू म्हेत्रे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे बाळू यांच्या वहिनी त्याठिकाणाहून जात होत्या. त्यावेळी आरोपींनी महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. डी. पवार तपास करीत आहेत.