अलिबागमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणामध्ये पोहण्याचा नादात गेलेल्या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर बनोटी गावामध्ये गुरे चरवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा मृतदेह दोन दिवसांनंतर धरणामध्ये  सापडला आहे.

म्हसळा तालुक्यातील आंबेत-संदेरी धरणावर आठ तरुण शनिवारी पोहण्यासाठी गेले होते. हे सर्व तरुण मुंबई येथून आपल्या मूळ गावी संदेरी येथे सुट्टीसाठी आले होते. या आठ तरुणांमध्ये एक संदेरी येथील गणेश डावरुंग वय 25 वर्षे याने संदेरी धरणातील खोल भागामध्ये उडी मारली. यानंतर काही कालावधीनंतर तो बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा पाण्यात जाऊन शोध घेतला. गणेश याचा शोध घेतल्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढला. यानंतर या तरुणाला जवळील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुसरीकडे शनिवारीच तालुक्यातील बनोटी येथील हरीचंद्र गाणेकर वय 50 वर्षे हा शेतकरी गुरे चारण्यासाठी जंगलामध्ये गेला होता. तेथे नदीचा ओंढा पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढून त्याचा पाय घसराल व 150 मीटर उंचीच्या धबधब्यावरून घरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. पोलीस आणि ग्रामस्थांनी शनिवार व रविवारी घेतलेल्या शोधमोहिमेनंतर सोमवारी गाणेकर यांचा शव खरसई धरणामध्ये सापडला.