जम्मू कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सकाळी हिंदुस्थानी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. पुलवामाच्या द्रबगाव भागात दहशतवाद्यांनी लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलावर गोळीबार केला. तेव्हा सुरक्षा दलाने उत्तर म्हणून दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या चकमकीत  दोन दहशतवादी ठार झाले असून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

सुरक्षादलाची संयुक्त टीम पुलवामात गस्तीव होती. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. मृत दहशतवाद्यांची नावे इरफान अहमद आणि इरफान शेख आहेत. दोघेही हिजबुल मुजाहिदीन संघटनेचे दहशतवादी होते.

इरफान अहमद हा 2017 पासून कार्यरत होता तर इरफान शेख हा 2016 मध्ये संघटनेत सामील झाला होता. मि”ळालेल्या माहितीनुसार या भागात अजूनही काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणाना मिळाली असून इथे शोधमोहीम सुरू आहे.