
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कसबयार भागात बुधवारी दहशतवादी व लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांमध्ये एकजण हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनाचा टॉपचा कमांडर यासिर पर्रे मारला गेला आहे. यासिर हा परदेशी दहशतवादी आहे.
Pulwama encounter | Two terrorists killed, their identity is being ascertained; search operation underway: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) December 1, 2021
कसबयार भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व लष्कराच्या संयुक्त पथकाने या भागात शोध मोहिम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एकाची ओळख यासिर पर्रे अशी झाली असून तो जैशचा टॉपचा कमांडर आहे. तर फुरकान असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव असून तो आयईडी एक्सपर्ट आहे.
#PulwamaEncounterUpdate | Top JeM terrorist commander Yasir Parray, an IED expert & foreign terrorist Furqan were neutralized in the encounter. Both were involved in several terror crime cases: IGP Kashmir to ANI pic.twitter.com/EJYtwYGgxh
— ANI (@ANI) December 1, 2021




























































