
भरधाव रिक्षा विरुद्ध दिशेने चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे एकजण उपचारादरम्यान ठार झाला. हा अपघात 12 एप्रिलला फुरसुंगी परिसरातील रस्त्यावर घडला. संजय नामदेव कामठे (57, रा. फुरसुंगी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी कैलास कामठे (51) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दुचाकीवरून 12 एप्रिलला भेकराईनगरहून फुरसुंगीत घरी चालले होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव रिक्षा चालवत आलेल्या चालकाने संजय यांना धडक दिली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान, त्यांचा काल मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी रिक्षाचालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


























































