पुणे-नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पुणे शहरातील अज्ञात वाहन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे-नगर रस्त्यावरील जुना जकात नाका येथील हॉटेल मराठा दरबारसमोर 11 फेब्रुवारीला हा अपघात घडला.
प्रमोद तानाजी शिवरामजी (20) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नरेश मनोहरराव निटूरे (32) यांनी फिर्याद दिली असून विमानतळ पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद 11 फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल मराठा दरबार समोरील रस्त्यावरून जात होता. त्यावेळी भरधाव वाहनचालकाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रमोदचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास सुरू आहे.