दुचाकीस्वाराची सोनसाखळी हिसकाविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

दुचाकीस्वार चोरट्यांनी तरूणाच्या गळ्यातील 60 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी मगरपट्टा परिसरात घडली. एका आमदाराच्या बंगल्याजवळ चोरीची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोपाळ भुतडा (वय 51, रा. वाघोली ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल आणि त्यांचे मित्र शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून वाघोलीला जात होते. त्यावेळी मगरपट्टा परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी गोपाल यांना अडविले. त्यांच्या गळ्यातील 60 हजारांची सोन्याची चेन हिसकावून नेली. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी दुचाकीस्वार चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण अधिक तपास करीत आहेत.