दिव्यात तिकिटाच्या वादातून दोन तरुणांचा टीसीवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिकीट आणि अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र नसतानाही लोकलमधून प्रवास करणाऱ्या तरुणाला हटकताच त्याने तिकीट तपासनीसावर (टीसी) हल्ला केल्याची घटना दिवा रेल्वे स्थानकात घडली. या हल्ल्यात तिकीट तपासनीस जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुणाल शिंदे (20) हा तरुण लोकलमधून प्रवास करत होता. दिवा रेल्वे स्थानक येथे त्याला टीसीने अडवले. त्याच्याकडे तिकीट आणि ओळखपत्राची मागणी केली. मात्र कुणाल याच्याकडे तिकीट अथवा ओळखपत्र नसल्याने त्याने टीसीसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच त्याचा मित्र हर्षल भगत (25) याला रेल्वे स्थानकात बोलवून घेतले. या दोघांनी मिळून टीसीला बेदम मारहाण केली.