उबरची बोट सेवा लांबली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मोबाईल अॅपद्वारे टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या उबर या कंपनीने 1 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बोटसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही बोटसेवा लांबली आहे. उबर इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या सहकार्याने उबरने बोटसेवा देण्याची घोषणा केली होती. अशाप्रकारे बोटसेवा देण्याची ही जगातील दुसरी तर हिंदुस्थानातील पहिलीच वेळ आहे. 2017मध्ये उबरने क्रोएशियातील द्वीपांसाठी अशा प्रकारची बोटसेवा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर गेट वे ऑफ इंडिया, एलिफंटा आणि मांडवा जेट्टीवरून प्रथमच ही सेवा सुरू होणार होती. या बोटचं भाडं 5700 रुपये इतकं असणार आहे. सहा ते आठ आसनी स्पीडबोटींच्या साहाय्याने वाहतूक केली जाणार आहे. मात्र, आता काही तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा लांबली आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू होईल हे अद्याप उबरकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.