
बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी युको बँकेने 532 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती अप्रेंटिस पदासाठी केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी 21 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून अखेरची डेडलाईन 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण देशभरात असणार आहे. महाराष्ट्रात 33 जागा भरल्या जाणार आहेत. राजस्थान 37, ओडिशा 42, हिमाचल प्रदेश 25, बिहार 35, आसाम 24, पश्चिम बंगाल 86, उत्तर प्रदेश 46 जागा भरल्या जाणार आहेत.



























































