सेक्स करणाऱ्या जोडप्यावर फेविक्विक टाकलं मग गुप्तांगावर वार करून हत्या, मांत्रिकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये अतिशय क्रूर आणि धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका मांत्रिकाने एका जोडप्याला शारीरिक संबंध ठेवत असताना त्यांच्यावर गोंद टाकून त्यांची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मांत्रिकाला अटक केली आहे.

राजस्थानच्या उदयपूर येथील गोगुन्दा येथे 18 नोव्हेंबर रोजी राहुल आणि सोनू कुंवर या जोडप्याचे मृतदेह आढळले होते. हे दोन्ही मृतदेह विवस्त्रावस्थेत होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास करायला सुरुवात केली होती. अवघ्या 72 तासांत पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित विवाहित होते. पण त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे ही हत्या त्यामुळेच झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. जवळपास 200 लोकांची चौकशी करण्यात आली आणि त्यातूनच पोलिसांना मांत्रिक भालेक कुमार याचं नाव समोर आलं. त्याला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मांत्रिक भालेश कुमार गेल्या सात ते आठ वर्षांपासून लोकांना ताईत देऊन त्यांच्या समस्या दूर करत होता. सोनू कुंवर आणि राहुल यांचे कुटुंबीय या मंदिरात येत होते. याचवेळी राहुल आणि सोनू यांच्यात मैत्री झाली होती. याचमुळे राहुल आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडत असे. यानंतर राहुलच्या पत्नीने मांत्रिक भालेशकडे मदत मागितली होती. मांत्रिकाने राहुलच्या विवाहबाह्य संबंधांविषयी तिला सर्व काही सांगितलं. तसंच त्याने राहुलची प्रेयसी सोनूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

राहुल आणि सोनू यांनी भालेश कुमारला धमकी दिली होती. आपले भक्त आणि समर्थकांमध्ये बदनामी होईल या भीतीने भालेशने हत्येचा कट रचला. यासाठी त्याने बाजारातून फेव्हिक्विकची 50 पाकिटं खरेदी केली आणि एका बाटलीत सगळी भरली. 15 नोव्हेंबरच्या रात्री भालेशने राहुल आणि सोनू यांना मदत करण्याचा बहाणा करत बोलावलं. यानंतर तो त्यांना गोगुन्दा परिसरातील जंगलात घेऊन गेला.

भालेशने घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांनाही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास सांगितलं. यानंतर त्याने फेव्हिक्विकने भरलेली बाटली त्यांच्या अंगावर ओतली. दोघांनाहीकाही कळण्याच्या आत ते चिकटले होते. त्यांनी वेगळं होण्याचा प्रयत्नही केला. पण या दरम्यान भालेशने चाकू आणि दगडाने त्यांच्यावर हल्ला केला. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.