
महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत देशाचे 49 वे सरन्यायाधीश झाले असून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधीला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. दरम्यान, शपथविधीनंतर लळीत यांनी आपल्या 90 वर्षीय वडिलांचे आशीर्वाद घेतले.
नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. ‘प्रत्येक प्रकरणांच्या यादीत पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न असेल.’ तसेच तातडीची प्रकरणे संबंधित घटनापीठांसमोर मुक्तपणे मांडता यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार असून वर्षभर चालेल असे घटनापीठ बनविण्याची इच्छा आल्याचे मतही त्यांनी शपथविधीनंतर व्यक्त केले आहे. दरम्यान, लळीत यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




























































