उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे़. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी आजपासून त्यांच्या कामकाजाला जनता दरबारने सुरुवात केली आहे़.

काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता़. काल रविवारी पुन्हा कोरोना तपासणी केल्यानंतर त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला़. त्यानंतर स्वतः उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टि्‌वीट करुन त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली़. गेले काही दिवस ते विलगीकरणात होते़. त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर आजपासुन त्यांनी मुंबईत जनता दरबारने आपल्या कामकाजास सुरुवात केली़.