
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱयावर येत आहेत. यावेळी ते कल्याण, डोंबिवलीतील विविध शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या स्वागताची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे.
उद्धव ठाकरे यांचा दुपारी 12 वाजता अंबरनाथ येथून दौरा सुरू होणार असून नेवाळी, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा, मुंब्रा येथील शाखांना ते भेटी देणार आहेत. यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कल्याण, डोंबिवली दौऱयावर येत असल्याने शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह आहे.
































































