Photo – मुंबईकरांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केला शिवशक्तीचा वचननामा

शिवसेना भवन येथे 4 जानेवारी रोजी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा जाहिर केला. मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना विकासाचे वचन दिले. ‘आपली मुंबई कशी असेल’ याचे चित्रच यातून स्पष्ट झाले आहे.