Photo – मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे कुटुंबाचं आई मुंबादेवीला साकडं

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात गेले होते. यावेळी ठाकरे कुटुंबीय आई मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी साकडं घातलं.

मुंबईवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला दूर लोटून, आम्हां मुंबईकरांवर तुझी सदैव कृपादृष्टी राहूदे! असे साकडे यावेळी त्यांनी घातले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, मनसे नेते अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, मिताली ठाकरे व उर्वशी ठाकरे उपस्थित होते.