
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात शिवसैनिकांतर्फे आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्याचे वाटप, रुग्णांना फळवाटप तसेच सदस्य नोंदणी अभियान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कांजूरमध्ये गरजूंना जीवनावश्यक साहित्य
कांजूर शिवसेना शाखेच्यावतीने गरजूंना साखर, तांदूळ, तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, शाखाप्रमुख रवींद्र महाडिक, शाखा संघटक प्रतिभा राणे, उपशाखाप्रमुख जयेश मगर, वैभव मोरे, भास्कर परब, सुनील माळी, सुहास राणे आदी उपस्थित होते.
बेळगावातही जल्लोषात वाढदिवस साजरा
बेळगावात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, उपजिल्हाप्रमुख सुरेश लाडगे, सचिन गोरले, माजी महापौर अप्पा पुजारी, दत्ता पाटील, श्याम पाटील, नीलेश मोरे, महिपाल यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

























































