
शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांच्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी भूमिका मांडतील
- भूमिका सतत बदलत असते. काही विधानसभेत काम करतील, काही विधानसभेबाहेर काम करतील – मुख्यमंत्री
- ज्यांना आम्ही सोबत घेऊ शकत होतो, योग्य होतो त्यांना आम्ही घेतले – मुख्यमंत्री
- महाराष्ट्र जर चांगला घडवायचा असेल तर तुझं माझं करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विचार करायला हवा
- लहान भाऊ मोठा भाऊ हे महत्त्वाचं नाही दोन भाऊ एकत्रं जाणं महत्त्वाचं आहे – उद्धव ठाकरे
- मुख्यमंत्री आम्ही आपआपसात बसून ठरवू – उद्धव ठाकरे
- आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं
- शिवसेना -124 जागा, भाजप – 150, मित्रपक्ष – 2
- महाराष्ट्राच्या मनातली महायुती आज मैदानात उतरलीय – मुख्यमंत्री
- शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करायचे असेल तर निसर्गावर अवलंबून राहता येणार नाही.
- गेली पाच वर्ष जलसंधरणाचं चांगलं काम आमच्या सरकारने केलंय. पुढच्या पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे.
- महाराष्ट्रात विकासाची सुरुवात केली आहे.
- जर समजावल्यानंतरही बंडखोरी केली तर त्यांना त्यांच्या जागा दाखवून देऊ
- कुठेही बंडखोरी राहणार नाहीत.
- अनेक ठिकाणी बंडखोर झालीय. काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर आहेत. त्या नेत्यांना कार्यकर्त्यांना समजावणार आहोत.
- मुंबईत आदित्य ठाकरे निवडून येतील. मी त्यांचे स्वागत करतो – मुख्यमंत्री
- महायुती संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येईल
- एकत्र राहायचं असेल तर तडजोड करावी लागते ती आम्ही सर्वांनी केलीय
- लोकसभेत महायुतीला लोकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यात एनडीएला मोठं यश मिळालं. त्या यशात महायुतीचा मोठा वाटा होता – मुख्यमंंत्री
- पण हिंदुत्त्वाचा धागा शिवसेना व भाजपला जोडतो
- लोकसभेच्या वेळी महायुतीची घोषणा केलेली तेव्हाच माहित होतं की काही मतभेद असतीलच
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले

- मनोहर जोशी, आशिष शेलार, अनिल देसाई, राज पुरोहित उपस्थित
- थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार
























































