शिवसेना भवनावर दावा करायला मोगलाई आहे का; उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना हे पक्षाचे नाव व व धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत.

  • जनता लोकशाहीचे वस्त्रहरण स्वीकार करणार नाही.
  • राज्यातील जनता जागरुक ओआणिसंवेदनशील आहे, जनता पेटून  उठलेली आहे. ते हे सहन करणार नाही.
  • शिवसेना भवनावर दावा करायला मोगलाई आहे का,
  • आम्ही त्यांना प्रतिज्ञापत्र आणि इतर बाबतीत भारी पडल्यानेच त्यांनी थातूरमातूर कारण दिलेले आहे.
  • नेते गेले तरी नेता बनवणारी शक्ती माझ्याकडे आहे. जनता आपल्य़ासोबत आहे.
  • निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही मर्दासारखे लढणार आहोत.
  • निवडणुका जाहीर करण्यासाठीच त्यांनी ठरवून हा निकाल दिलेला आहे.
  • अनेकांना शिवसेनेने मोठे केले आहे. मात्र, त्यांच्यात मनाच मोठेपणा आलाच नाही.
  • ती अपक्षाही फोल ठरली तर देशात निवडणुका घेण्याची गरजच नाही, एकछत्री अंमल सुरू करा
  • आता आमचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. ते निपक्षपातीपणे निर्णय देतील, अशी अपेक्षा आहे.
  • त्यांना पक्ष, चिन्ह आणि उमेदवारही चोरावे लागत आहेत. त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे असे काहीच नाही.
  • आता जनतेवनेही या जुलमी आणि अन्यायी सरकारला हटवण्याची वेळ आली आहे.
  • आणबाणीनंतर पर्याय कोण, याचा विचार न करता जनतेने त्यांना नाकारले होते.
  • आपण आपल्या डोळ्यासमोर लोकशाही संपताना बघणार आहोत का, याचा विचार करण्याची गरज आहे.
  • सगळे वरपासून खालपर्यंच मिळालेले असतील तर हे गंभीर आहे.
  • ही त्यांची चोरी आहे. ही चोरी त्यांना पचणार नाही.
  • कदाचित हे उद्या आमची मशालही काढून घेतील. मशालीची धग काय असते, ते त्यांना दाखवावे लागते.
  • या निर्णयामुळे शिवसेना संपणार नाही. आता शिवसेना अधिक जोमाने पुढील वाटचाल करणार आहे.
  • आता सर्वोच्च न्यायालयातच या निर्णयाला आव्हान देणार आहोत. लोकशाहीचे भवितव्य आता तेथेच ठरणार आहे.
  • काँग्रेसने आणीबाणी जारी केली होती. तर तुम्हीही तेच करणार का, इंदिरा गांधीमध्ये आणीबाणीनंतर निवडणुका घेण्याची हिंमत होती. ती त्यांच्यात नाही.
  • आचारसंहिता जारी असलेल्या राज्याबाबतचा निर्णय देत निवडणूक आयोगाने देत नियमांचे उल्लंघन केले आहे.
  • पक्ष आणि जनता आमच्यासोबत आहे. हिंमत असेल तर निवडणुका घ्याव्यात.
  • आपल्या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे, अशी घोषणा आता पंतप्रधानांनी करावी, आता देशात लोकशाही नसल्याचे दिसत आहे.
  • बाळासाहेब आणि शिवसेना नाव घेतल्याशिवाय राज्यात थारा नाही, हे त्यांना समजले आहे.
  • बाळासाहेबांचे विचार त्यांना कळलेच नाही.
  • कोणाचे गुलाम व्हा, असे बाळासाहेबांनी कधीच सांगितले नाही. अन्यायाविरोधात लढा, हेच त्यांनी शिकवले.
  • लाखोच्यावर प्रतिज्ञापत्र दिली आहेत. जर त्यांना हाच निर्णय द्यायचा होता, तर एवढा खटाटोप का करायला सांगितले
  • निवडणूक आयोगाने जे जे मागितले, ते ते सर्व दिले आहे.
  • या निर्णयामुळे देशातील लोकशाही आणि अर्थव्यवस्था यावर परिणाम होणार आहे.
  • या प्रकरणाकडे राज्याचे नाही, तर जगाचे लक्ष आहे.
  • आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
  • याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काही परिणाम होईल, असे वाटत नाही.
  • जनता याचा धडा त्यांना शिकवल्याशिवय राहाणार नाही.
  • त्यांना शिवसेना हे नाव, धनुष्यबाण चोरावे लागेल,नामर्दांना ही चोरी पचणार नाही
  • शिवसैनिकांनो, शिवसेनाप्रेमींनो खचू नका, अंतिम विजय आपलाच आहे. तोपर्यंत आपल्याला लढावे लागेल.
  • या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.
  • नामर्दच अशी चोरी करू शकतात.
  • धनुष्यबाण हे ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही
  • या एका निर्णयाने संपणारी शिवसेना नाही, शिवसेना लेचीपेची नाही
  • सत्याचाच विजय होत आलेला आहे. आताही तोच होणार आहे.
  • खरे धुनष्यबाण आपल्याकडे आहे. शिव,सेनाप्रमुखांनी पुजा केलेला धनुष्यबाण आमच्या पुजेत आहे आणि तो पुजेतच राहणार आहे.
  • त्यांनी आजच्यासाठी कागजावरचे धनुष्यबाण चोरले आहे.
  • त्यांना कशीही करून मुंबई जिंकायाची आहे. मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देत दिल्लीच्या दारी त्यांना उभी करायची आहे.
  • आपण त्यांना निवडणुका घेण्याचे अनेकदा आव्हान दिले आहे. मात्र, निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत नाही.
  • या सर्वांचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नाही.
  • पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने आता कदाचित महिन्या दोन महिन्यात निवडणुकाही जाहीर करण्यात येतील
  • आजचा हा निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे.
  • पक्ष कोणासोबत आहे, हे जर आकड्यांवर ठरत असेल तर कोणताही धनाठ्य व्यक्ती आमदार, खासदार विकत घेऊन पक्षावर कब्जा करतील
  • आजचा निर्णय अनपेक्षित आहे. सहा महिने लढाई सुरू आहे.
  • सरकारची दादागिरी सुरू आहे.