
सोने खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून 1 लाख 29 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कम पळवण्यात आली. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरी प्रकरणी श्वेता पवार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्या घरातून सोने खरेदीसाठी आणि गंठण गटवण्याचे काम करण्यासाठी घराबाहेर पडल्या. हनुमान कट्टा येथे राखी स्टॉलजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधून रोख रक्कम 20 हजार रुपये आणि सोन्याचे दागीने ज्यामध्ये एक गंठण, एक नेकलेस, कानातील झुमके असा सुमारे 1 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज पळवला. अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
































































