महिलेने बीचवर कपडे उतरवले, ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी अवलंबला हा मार्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलंबियाच्या एका गजबजलेल्या समुद्र किनारी एका महिलेने चक्क तिचे कपडे उतरवल्याने एकच खळबळ उडाली. त्या महिलेला असे उघडे फिरताना पाहून पोलिसही हडबडले. त्यांनी तिला कपडे घालण्यास सांगितले. अनेकदा विनंतीही केली. मात्र ती महिला काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. रुबी माकेआ पाचेको असे त्या महिलेचे नाव असून ती 52 वर्षांची आहे.

रुबी बिकीनी घालून समुद्र किनारी आली होती. काही वेळ इथे तिथे फिरल्यानंतर अचानक तिने ब्रा काढली व समुद्रात पोहायला गेली. त्यानंतर तशाच उघड्या अवस्थेत ती बाहेर फिरत होती. तिला पोलिसांनी हटकले व कपडे घालण्यास सांगितले. मात्र ती पोलिसांचे ऐकतच नव्हती. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच तिला 4 लाख कोलंबियन पेसॉसचा दंड ठोठावला.

‘मी युएफओ रिलिजनची सदस्या आहे. मला असे वाटते मला जबरदस्ती कपडे घालायला लावणे हे सेक्सिझम आहे’. अशी प्रतिक्रीया रुबीने प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.