उजनीत उन्हाळ्यासाठी 7 टीएमसी पाणी आरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरणात 7 टीएमसी पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्यात भीमा नदीमार्गे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सोलापूर जिह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, अधीक्षक अभियंता सुभिवेंद्र खांडेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते

उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उजनी धरणामध्ये पिण्यासाठी आवश्यक पाणी राखून ठेवण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार उजनी धरणात 7 टीएमसी पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मे महिन्यात भीमेत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.