
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे छोटा राजनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. छोटा राजनच्या पोटात दुखु लागल्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Underworld don Chhota Rajan was admitted to All India Institute of Medical Sciences in Delhi on 27th July after he complained of ill health; He is currently under treatment at the hospital
(file photo) pic.twitter.com/QDO0alslNJ
— ANI (@ANI) July 29, 2021
राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हाही छोटा राजनला एम्समध्ये दाखल कराण्यात आले होते. सध्या छोटा राजन तिहार तुरुंगात कैद आहे. 2015 साली इंडोनेशियाच्या बालीमधून त्याला अटक करण्यात आली होती.
मृत्यूची अफवा
मे महिन्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनाने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांच्या हवाल्याने ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने छोटा राजन जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा खुलासा केल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते.





























































