बेरोजगारीचे प्रमाण वाढले, एप्रिलमध्ये कोट्यवधीं मजुरांच्या हातून गेला रोजगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनदरम्यान मजुरांचे सर्वाधिक हाल झाले आहेत. एकीकडे काम नसल्याने ते शहरात अडकले आहेत. आता केंद्र सरकारने त्यांना स्वगृही परतण्याची व्यवस्था केली आहे. पण लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यात मजुरांचे नुकसान झालेच आहे, तसेच छोट्या मोठ्या व्यापार्‍यांचेही नुकसान झाले आहे. एप्रिलमध्ये बेरोजगारी दर 23.5 टक्के होता.  तर 3 मे पर्यंत हा दर 27.1 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सेंटर ऑफ मॉडर्न इकोनॉमी इन इंडिया या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात 12.15 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यात सर्वाधिक 9 कोटी 13 लाख मजूर आणि छोट्या व्यापार्‍यांकडे काम करणार्‍यांचा समावेश आहे. तसेच 1 कोटी 82 लाख कोटी व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला आहे. तसेच 1 कोटी 78 लाख पगारी कर्मचार्‍यांचे रोजगार गेले आहेत. या सगळ्यात एकच चांगली गोष्ट म्हणजे 20 एप्रिल नंतर 58 लाख शेतकर्‍यांनी शेतीच्या कामाला सुरूवात केली आहे.

बेरोजगारीचा सर्वाधिक फटका झारखंड आणि तमिळनाडू राज्याला बसला आहे. तमिळनाडूमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 49.8 टक्के झाले आहे, तर झारखंडमध्ये 47.1 टक्क्यांवर बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.