हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांत तक्रारखोर पाकिस्तानचे थोबाड फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वत:च्या देशात हिंसा आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या व अल्पसंख्यांक नागरिकांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानने आम्हाला शांतीचे धडे शिकवू नयेत. पाकिस्तानने आधी स्वत:ची नियत व वागणूक सुधारावी आणि नंतर दुसऱ्या देशांवर मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याची तक्रार करावी, अशा शब्दांत आज संयुक्त राष्ट्रांतील हिंदुस्थानच्या स्थायी काऊन्सिलर पौलमी त्रिपाठी यांनी तक्रारखोर पाकिस्तानचे थोबाड फोडले. त्या ‘शांततेची संस्पृती’ या परिसंवादात बोलत होत्या.

स्वत: अल्पसंख्यांकांवर अत्याचार करून त्यांचे सक्तीने धर्मांतर घडवणाऱ्या पाकने दुसऱ्या देशांवर खोटे-नाटे आरोप लावणे योग्य नाही, असाही संतप्त इशारा त्रिपाठी यांनी यावेळी बोलताना दिला. संयुक्त राष्ट्रांत हिंदुस्थानची बाजू अतिशय सक्षमपणे मांडताना हिंदुस्थानी काउन्सिलर पौलमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानचे चांगलेच वाभाडे काढले. त्रिपाठी म्हणाल्या, आम्हाला शांतता आणि मानवतावाद शिकवावा ही आश्चर्याची बाब आहे. आधी स्वत:च्या पायाखाली काय जळतंय ते पहा आणि नंतर न्यायाने वागणाऱ्या हिंदुस्थानला शिकवायला या असेही त्रिपाठींनी बजावले.