व्हॉट्सऍप आता फिंगरप्रिंटने उघडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

व्हॉट्सऍप हे मेसेजिंग ऍप अधिक सुरक्षित बनले असून या ऍपला फिंगरप्रिंट लॉकिंग सिस्टिम लवकरच आणली जाणार आहे. त्यामुळे व्हॉट्सऍपवरील मेसेज आता तुमच्या परवानगीशिवाय कुणीच वाचू शकत नाही.

फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सऍपच्या युजर्सकडून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनची मागणी होत होती. व्हॉट्सऍपने लेटेस्ट बीटा व्हर्जनवर हे फिचर्स आणले आहे. आयफोन युजर्सना यापूर्वीच व्हॉट्सऍपवर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनचा ऑप्शन मिळत आहे. आयफोनवर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनशिवाय फेस आयडीवरून ऍप अनलॉक करण्याचा ऑप्शनही उपलब्ध आहे.

  • ऍण्ड्राईडवर व्हॉट्सऍपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जन अपडेट 2.19.83 नुकतेच आले आहे.
  • बीटा युजर्स हे फिचर सेटींगमध्ये जाऊन ऑन करू शकतात.
  • बाय डिफॉल्ट हे फिचर सध्या डिसेबल असून सर्व बीटा युजर्सला ते मिळत नाही.
  • WAbetaInfo ने हे फिचर्स कसे सुरू करायचे याविषयी माहिती दिली आहे.
  • युजर्सना ऍपच्या settings मध्ये जाऊन account privacy – Use fingerprint to unlock सिलेक्ट करायचे आहे.

फिंगरप्रिंट रजिस्टर होणार

फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फिचर ऑन झाल्यावर व्हॉट्सऍप युजर्सचे फिंगरप्रिंट रजिस्टर होणार आहे. त्यानंतर युजर्सना विचारले जाईल की ऍपचे बॅकग्राऊंड बंद केल्यानंतर किती वेळात तुम्ही ते लॉक करू पाहता. येथे युजर्सना लगेच ऍप लॉक करणे किंवा 1 मिनीट, दहा मिनिटे तसेच 30 मिनिटांनंतर लॉकिंगचा ऑप्शन आहे. त्यानंतर फिंगरप्रिंटने युजर्सना व्हॉट्सऍप अनलॉक करण्यासाठी खूण दिसेल. चुकीच्या फिंगरप्रिंटने ऍप अनलॉक करण्याचा प्रयत्न केल्यास एरर असा मेसेज येईल.